AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC Policy : ही योजना सुपरफिट! फायदे वाचून, पॉलिसी कराल खरेदी

LIC Policy : एलआयसीच्या अनेक योजना लोकप्रिय आहेत. या योजनांमध्ये ग्राहकांना मोठा परतावा मिळतो. पारंपारिक गुंतवणूकदारांना या योजना लॉटरीपेक्षा कमी नाहीत. या योजनांमध्ये कोणतीही जोखीम नसल्याने ग्राहक यामध्ये रक्कम गुंतवतात.

LIC Policy : ही योजना सुपरफिट! फायदे वाचून, पॉलिसी कराल खरेदी
| Updated on: Feb 24, 2023 | 9:36 PM
Share

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय जीवन महामंडळाच्या (LIC) अनेक योजना लोकप्रिय आहेत. या योजनांमध्ये ग्राहकांना मोठा परतावा मिळतो. पारंपारिक गुंतवणूकदारांना या योजना लॉटरीपेक्षा कमी नाहीत.  एलआयसीच्या  या योजनांमध्ये कोणतीही जोखीम नसल्याने ग्राहक यामध्ये रक्कम गुंतवतात. जीवन आनंद पॉलिसी (Jeevan Anand Policy) ही अशीच एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेत तुम्हाला केवळ 2500 रुपयांचा मासिक हप्ता जमा करुन अनेक फायदे मिळविता येतात. या योजनेत गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळतो. त्यामुळे ग्राहक जोखीम मुक्त गुंतवणूक म्हणून एलआयसीमध्ये रक्कम गुंतवतात.

या योजनेमध्ये तुम्हाला सुरक्षेसह परताव्याची हमी पण मिळते. या योजनेत एक लाख रुपयांच्या समअश्योर्ड घेणे आवश्यक आहे. गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. तुम्हाला कितीही रक्कम अश्योर्ड करता येते. न्यू जीवन आनंद पॉलिसीचा लॉक इन पीरियड 15 ते 35 वर्ष आहे. ही योजना तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खरेदी करु शकता. या योजनेसाठी तुम्ही वार्षिक, सहामाही अथवा दर महिन्याला प्रीमियम भरावा लागेल.

जर 25 वर्षींच्या व्यक्तीने पाच लाख रुपयांची योजना 12 वर्षांकरीता घेतली तर, 27010 रुपयांचे वार्षिक प्रीमियम 21 हप्त्यात जमा करावे लागेल. त्या व्यक्तीची एकूण गुंतवणूक 5.67 लाख रुपये होईल. या योजनेत तुम्हाला बोनस पण मिळते. दर वर्षी ही रक्कम जवळपास 48 रुपये प्रति हजार रुपये मिळते. यामध्ये वेळोवेळी बदल होतो. पण 40 से 48 रुपये प्रति हजार या दरम्यान ही रक्कम मिळते.

या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटीवर 5 लाख रुपये मिळतील. तुम्हाला त्यासाठी दर महिन्याला 2500 रुपये हप्ता द्यावा लागेल. त्यावर तुम्हाला 22500 रुपये बोनस मिळेल. म्हणजे तुम्हाला संपूर्ण पॉलिसी वर आतापर्यंत 4.5 लाख रुपयांचे बोनस आणि 10 हजार रुपयांचे अतिरिक्त बोनस मिळते. तर 5 लाख रुपये तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीवर मिळेल.

तुम्हाला मॅच्युरिटीवर 5 लाख रुपये तर मिळतीलच. पण सोबतच 4.60 लाखांचा बोनस ही मिळेल. या पॉलिसीची माहिती तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळेल. अथवा तुम्हाला एजंटकडून या योजनेची माहिती मिळेल. ही योजना तुम्ही ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने मिळेल.

एलआयसी धन वर्षा योजना ही एक नॉन-लिंक, वैयक्तिक, बचत आणि एकल प्रीमियम विमा योजना आहे. ही योजना बचतीसोबत चांगला परतावा देते. पॉलिसीधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास या योजनेत वारसदारांना लाभ मिळतो.या योजनेत गुंतवणुकीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.या योजनेत वारंवार प्रिमियम भरण्याची कटकटही नाही.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?