AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांना या सरकारी योजनेतून मिळत आहेत 5000 रुपये, असा लाभ मिळवा

पंतप्रधान मातृ वंदना योजनेचे मुख्य उद्दिष्ट गर्भवती आणि स्तनदा माता तसेच त्यांच्या बाळाचे आरोग्य सुधारणे आहे. या योजनेमुळे आई आणि बाळाला निरोगी ठेवण्यासाठी मदत होत आहे.

महिलांना या सरकारी योजनेतून मिळत आहेत 5000 रुपये, असा लाभ मिळवा
INDIAN CURRENCYImage Credit source: istockphoto
| Updated on: May 04, 2023 | 12:55 PM
Share

मुंबई : केंद्र सरकारच्या अनेक महत्वाच्या योजनांचा फायदा जर आपल्याला घ्यायचा असेल तर महिलांसाठी या योजनेव्दारे पाच हजार रूपयांची रक्कम मिळते. ही एक महिलांसाठी अशी महत्वपूर्ण योजना आहे जिचा फायदा केवळ गर्भवती महिला घेऊ शकतात. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ( PMMVY ) ही पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी सरकारची महिलांसाठीची महत्वाची योजना आहे. गर्भवती आणि बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांच्या आरोग्याची काळजी घेणारी ही योजना आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा ( PMMVY ) उद्देश्य महिलांचे आरोग्य सुधारून त्यांच्यातील कुपोषण दूर करणे, त्यांना योग्य उपचार आणि औषधांचा खर्च देणे हा आहे. पीएम मातृ वंदना योजनेत प्रेग्नंट आणि स्तनदा मातांना पाच हजार रूपये रोख दिले जातात. या पाच हजार रूपये तीन हप्त्यात डीबीटीद्वारे महिलांच्या खात्यात वळते केले जाते. प्रेग्नंट महिलांना या योजनेत रजिस्ट्रेशन करताना 1000 रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो. सहाव्या महिन्यात किमान एका तपासणीनंतर २००० रूपयांचा दुसरा हप्ता मिळतो. तिसऱ्यांदा बाळाच्या जन्मानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर 2000 रूपयांचा शेवटचा हप्ता दिला जातो.

या योजनेसाठी पात्रता काय

ज्या महिला रोजंदारी करून उपजिविका करतात किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना लाभ मिळवून देणे हा PMMVY योजनेचा उद्देश आहे. गरोदरपणात महिलांना मजूरी करण्याची वेळ येऊ नये आणि महिलांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ केवळ पहिल्या अपत्यालाच मिळतो.

हा फायदा होत आहे 

केंद्र सरकारची PMMVY योजना भारतातील महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशी ठरली आहे. या योजनेमुळे गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना आरोग्य उपचार आणि सुविधा उपलब्ध होत आहेत, त्यामुळे  कुपोषित मातांना फायदा होत असून त्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. तसेच त्यांच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. या योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक चिंता दूर झाली आहे. यामुळे महिलांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत आहे.

Follow Us
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद