बँकेत गॅरंटर होऊन तुम्ही फसला आहात का? मग गॅरंटरमधून ‘अशी’ करून घ्या आपली सुटका

| Updated on: Feb 13, 2022 | 5:30 AM

अनेकदा आपल्यावर देखील एखाद्या नातेवाईकांसाठी किंवा मित्रासाठी गॅरंटर राहण्याची वेळ येते. अशा परिस्थितीमध्ये जर संबंधित व्यक्तीने कर्ज भरले नाही तर बँक तुमच्याकडे विचारणा करू शकते. मात्र अशा परिस्थितीमध्ये घाबरून न जाता तुम्ही बँकेत जाऊन रितसर स्वता:ची गॅरंटरमधून सुटका करून घेऊ शकता.

बँकेत गॅरंटर होऊन तुम्ही फसला आहात का? मग गॅरंटरमधून अशी करून घ्या आपली सुटका
आरबीआय बँक
Follow us on

मुंबई : अनेकदा आपल्या जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना (friends) अर्जंट पैशांची (money) गरज असते. पैशांची गरज लागल्याने ते बँकेकडून कर्ज घेतात. कर्ज घेताना बँक (bank) त्यांचा सर्व तपशील तपासते. जसे की संबंधित व्यक्तीचा सीबील स्कोर, त्याची सॅलरी किती आहे. त्याने आधी काही कर्ज घेतले आहे का? तो नियमित आयटीआर भरतो का अशा सर्व गोष्टी चेक केल्या जातात आणि मगच त्याला कर्ज मंजूर केले जाते. मात्र कर्ज मंजूर करताना बँकेला दोन गॅरंटरची देखील आवश्यकता असते. समजा कोणत्याही कारणाने संबंधित व्यक्तीने कर्जाची परतफेड केली नाही तर त्या कर्जाची जबाबदारी ही गॅरंटरची असते. कर्जाबाबत बँक गॅरंटरकडे चौकशी करू शकते. अनेकदा आपल्यावर देखील एखाद्या नातेवाईकांसाठी किंवा मित्रासाठी गॅरंटर राहण्याची वेळ येते. अशा परिस्थितीमध्ये जर संबंधित व्यक्तीने कर्ज भरले नाही तर बँक तुमच्याकडे विचारणा करू शकते. मात्र अशा परिस्थितीमध्ये घाबरून न जाता तुम्ही बँकेत जाऊन रितसर स्वता:ची गॅरंटरमधून सुटका करून घेऊ शकता. त्यासाठी नेमकं काय करावे लागते हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

बँकेकडे रितसर अर्ज करा

तुम्ही जर एखाद्या मित्रासाठी किंवा नातेवाईकाच्या कर्जासाठी गॅरंटर बनला असाल आणि त्याने कर्ज भरण्यास टाळाटाळ केली तर अशा परिस्थितीमध्ये बँक गॅरंटरला जबाबदार धरते. मात्र अशा परिस्थितीमध्ये घाबरून जाऊ नका. अशा वेळी तुम्ही बँकेत जाऊन रितसर अर्ज करू शकता. बँकेला आपण गॅरंटर राहू इच्छित नाही असे सांगा. तसा अर्ज बँकेकडे सादर केल्यास तुमची या प्रकरणातून सुटका होऊ शकते. अशावेळी कर्जदार व्यक्तीला बँक गॅरंटर म्हणून दुसरा व्यक्ती शोधण्याचा सल्ला देते.

परदेशात नोकरी लागल्यास

तुम्हाला जर परदेशात नोकरी लागली असेल, तरी देखील तुम्ही गॅरंटरमधून तुमची सुटका करू शकता. तुम्हाला परदेशात नोकरी लागली आहे, याबाबतची माहिती संबंधित बँकेला द्या. तुमच्या नोकरीसंदर्भातील कागदपत्रे बँकेत सादर करा. आणि गॅरंटरमधून नाव काढून टाकण्याची विनंती बँकेला करा. तुमच्या विनंतीनुसार बँक तुमची गॅरंटरमधून मुक्तता करते.

नोकरी गमवल्यास

तुम्ही जर तुमची नोकरी गमावली असेल, तर अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही बँकेकडे गॅरंटर न राहण्याबद्दल अर्ज करू शकता. नोकरी गेल्याचा एखादा पुरावा संबंधित बँकेकडे सादर करा. गॅरंटर न राहण्याबद्दलचा अर्ज बँकेंकडे सादर करा. अशा परिस्थितीमध्ये बँक तुमची गॅरंटरमधून सुटका करते.

संबंधित बातम्या

भारतातील सर्वात मोठा बँकिग घोटाळा, स्टेट बँकसहित 28 बँकांना चुना; 22 हजार कोटींचा फेरफार!

ONGC मालामाल, तेल-गॅस भाववाढ पथ्यावर; थेट नफा 8 हजार कोटी!

पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल सव्वाशेपार? पहा अर्थमंत्री कराड काय म्हणतात