FACT CHECKER: कन्या सन्मान योजनेत मिळतात 2500 रुपये? खोट्या माहितीला बळी पडू नका, PIBचा मोठा खुलासा

केंद्र सरकारच्या (Central Government) अखत्यारितील माध्यम संस्था पीआयबीनं अशाप्रकारचे दावे फेटाळून लावले आहेत.यूट्यूब वरुन माहिती प्रसारित केली जाणाऱ्या योजना प्रत्यक्ष अस्तित्वात नाही

FACT CHECKER: कन्या सन्मान योजनेत मिळतात 2500 रुपये? खोट्या माहितीला बळी पडू नका, PIBचा मोठा खुलासा
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 8:52 AM

नवी दिल्ली : सोशल मीडिया आणि डिजीटल वापरात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फेसबुक, ट्विटर, यू-ट्यूब यांसारख्या माध्यमातून बनावट माहितीच्या प्रसारात देखील वाढ झाली आहे. यू-ट्यूबच्या माध्यमातून हजारो व्हिडिओ (Youtube Video) आपल्या पाहण्यात येतात. सध्या केंद्र सरकारच्या आर्थिक योजनांविषयीची माहिती यू-ट्यूबवरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. केंद्र सरकारच्या नावे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एका योजनेच्या आर्थिक लाभांचा तपशील सांगितला जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या (Central Government) अखत्यारितील माध्यम संस्था पीआयबीनं अशाप्रकारचे दावे फेटाळून लावले आहेत.यूट्यूब वरुन माहिती प्रसारित केली जाणाऱ्या योजना प्रत्यक्ष अस्तित्वात नाही. अशाप्रकारचे व्हिडिओ पूर्णत: बनावट आहे. नागरिकांना अशा माहितीपासून दूर राहावे अन्यथा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याचा थेट इशारा पीआयबीने (PIB) दिला आहे.

असा दावा, असे तथ्य-

यूट्यूब वर विविध व्हिडिओच्या माध्यमातून सरकारी योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे शुल्क देखील मागितले जात आहे. प्रधानमंत्री कन्या सन्मान योजने बाबतही व्हिडिओतून प्रसार केला जात आहे. केंद्र सरकार सर्व मुलींच्या खात्यात 2500 रुपये जमा करणार असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात येत आहे. दरम्यान, अशाप्रकारची कोणतीही योजना सध्या अस्तित्वात नसल्याचा खुलासा पीआयबीनं केला आहे.

सायबर तज्ज्ञांच मत-

अशाप्रकारच्या फसव्या योजनांसाठी माहिती एकत्रित केली जाऊ शकते. ज्याद्वारे सायबर गुन्हेगार थेट माहितीचा दुरुपयोग करू शकतात. त्यामुळे मोठ्या आर्थिक भुर्दंडाला देखील सामना करावा लागू शकतो असे मत सायबर तज्ज्ञांनी वर्तविलेलं आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ : चोरी जिवावर बेतली

अफवांपासून सावध राहा

पीआयबीनं फॅक्ट चेकच्या माध्यमातून दाव्याची सत्यता पडताळली आहे. व्हायरल व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्राची याबाबतची कोणतीही योजना आखलेली नाही. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अशा प्रकारच्या अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कसं कराल फॅक्ट चेक?

तुमच्याकडे अशाच स्वरुपाचे मेसेज येत असल्यास अशाप्रकारच्या मेसेजचे सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्हाला पीआयबीच्या माध्यमातून फॅक्ट चेकचा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला अधिकृत लिंक https://factcheck.pib.gov.in/ वर क्लिक करावे लागेल. यासोबतच तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल pibfactcheck@gmail.com यावर तथ्य शोधन करू शकतात.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.