ऑनलाइन जेवण मागवणं पडलं महागात, zomato ने सेम ऑर्डरवर उकळले जास्तीचे 178 रुपये

बरेच वेळा असं पहायला मिळतं की एकाच प्रॉडक्टच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन किमतीत जमीन-अस्मानाचा फरक असतो. ऑनलाइन विकताना कंपनी पहिल्यांदा वस्तूची किंमत जास्त दाखवतात आणि नंतर त्यावरच डिस्काउंटचे गाजर दाखवून ग्राहकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न करतात.

ऑनलाइन जेवण मागवणं पडलं महागात, zomato ने सेम ऑर्डरवर उकळले जास्तीचे 178 रुपये
ऑनलाइन जेवण मागवणं पडलं महागातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 1:38 PM

डिजीटलीकरणाकडे लोकांचा ओघ वाढत असून त्यामुळे ते सुविधाभोगी बनत आहेत. जेवणापासून ते औषधांपर्यंत , किराणा मालापासून ते भाजी-पाल्यापर्यंत सगळ्या गोष्टी फक्त एका क्लिकवर सहज उपलब्ध होतात. जेवण ऑनलाइन ऑर्डर (Online Food Order)करणे तर खूप वेगाने लोकप्रिय होत आहे. त्यामध्ये लोकांचा वेळ तर वाचतोच शिवायच ढाबा किंवा हॉटेलमध्ये उभं राहून वाटही बघावी लागत नाही. त्याशिवाय zomato, Swiggy सारखे प्लॅटफॉर्म्स ऑनलाइन ऑर्डरवर अनेक ऑफर्सही देत असतात. मात्र नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्हालाही धक्का बसेल. झोमॅटोवरील ऑफरनंतरही एका ग्राहकाला ऑफलाइन ऑर्डरपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले.

डिस्काऊंट होता तरी ऑनलाइन ऑर्डर पडली महागात

लिंक्डइन (LinkedIn) या प्रोफेशनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल काबरा या युझरने शेअर केलेल्या अनुभवातून ही बाब समोर आली आहे. राहुल यांनी एकाच हॉटेलच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन ऑर्डरचे बिल शेअर केलं. त्यांनी दोन्ही ठिकाणी एकच पदार्थ ऑर्डर केला, मात्र त्यांच्या किमती वेगवेगळया होत्या. राहुल यांनी दोन्ही वेळेस ब्लॅक पेपर सॉस, फ्राईड राईस आणि मोमोज ( Veg black pepper sauce, Vegetable fried rice, and Mushroom momo)ऑर्डर केले. ऑफलाइन ऑर्डर केल्यावर एकूण 512 रुपये बिल आले, ज्यामध्ये (CGST)आणि ( SGST)चा समावेश होता. आणि हेच पदार्थ ऑनलाइन ऑर्डर केल्यावर 689.90 रुपये बिल भरावे लागले , विशेष म्हणजे 75 रुपयांची सूट (Zomato Discount)मिळाल्यावरही एवढी रक्कम भरावी लागली.

युझरने केली सरकारी हस्तक्षेपाची मागणी

लिंक्डइन वर अनुभव शेअर करताना राहुल यांनी लिहीले की, दोन्हीकडे सेम पदार्थ ऑर्डर करूनही ऑनलाइनमध्ये 178 रुपये म्हणजेच 34.76 टक्के जास्त रक्कम भरावी लागली. मला वाटतं किमतींमधील या तफावतीवर मर्यादा घातली पाहिजे. सरकारने यात हस्तक्षेप केला पाहिजे, जेणेकरून सर्व भागधारकांचा फायदा होईल. नव्या ग्राहकांशी जोडले जाण्यासाठी स्टार्टअप खूप प्रयत्न करत आहेत. ग्राहकांची लाइफटाइम व्हॅल्यू वाढवण्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे. कस्टमर ॲक्व्हिझिशन आणि रिटेंशनच्या बाबतीत झोमॅटो नेहमीच वरती राहिले आहे, असे मला वाटते. कारण झोमॅटोचे कॉन्स्टन्ट ओम्नी चॅनेल ॲडव्हर्टायझिंग राहिले आहे. पण हे लक्षात घेतले पाहिजे की एक सामान्य भारतीय ग्राहक नेहमी किमतीवर लक्ष ठेवतो. जिथे कमी किंमत असेल तिथेच खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर व्हायरल झाली पोस्ट

राहुल काबरा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली आहे. डिस्काऊंटचे गाजर दखवून झोमॅटो लोकांकडून जास्त पैसे उकळत आहे, हे लोकांनाही लवकरच समजेल. तेव्हा ते झोमॅटोवरून ऑर्डर करणे बंद करतील किंवा दुसरा पर्याय निवडती, असे राहुल यांनी नमूद केले आहे. या पोस्टवर हजारो रिअॅक्शन्स आल्या असून अनेक लोकांनी ऑनलाइन ऑर्डर केल्यावर किमतींमधील भेदभावांचे अनुभव शेअर केले आहेत.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.