AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air India Plane Crash : अहमदाबादेत टेकऑफवेळी मोठी दुर्घटना, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्याच विमानात?

Air India Plane Crash : अहमदाबादेत टेकऑफवेळी मोठी दुर्घटना, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी त्याच विमानात?

| Updated on: Jun 12, 2025 | 4:03 PM
Share

एअर इंडियाचं विमान लंडनला जात होतं आणि टेकऑफच्या वेळेला हे विमान कोसळलेलं आहे. विमानाचा मागचा भाग झाडाला अडकला आणि त्यामुळे हे विमान क्रॅश झाल्याची माहिती आहे. या विमानामध्ये साधारण २४२ प्रवासी होते. हे प्रवासी विमान लंडनला जात होतं. त्यावेळी हा अपघात घडला.

अहमदाबादेत एअर इंडियाचं विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातामुळे मोठ्या हानीची शक्यता वर्तवली जात असून टेक ऑफच्या १० मिनिटानंतर हे विमान अहमदाबाद येथे कोसळले. हे प्रवासी विमान लांडनला जात होते. विमान लांडनला जात असताना टेकऑफवेळी हा विमान अपघात झाला. २४२ प्रवासी विमानात असल्याची माहिती असून एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली आहे. तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी या विमानामध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना घडताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलेला आहे. तातडीने बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे. ज्या ठिकाणी हे प्लेन क्रॅश झालं त्याच्या जवळच सरकारी रुग्णालय आहे. त्यामुळे यात जखमी झालेल्यांना आणि होरपळलेल्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात आणलं जात आहे. मोठी जीवितहानी या विमान दुर्घटनेत झाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 12, 2025 03:08 PM