Fadnavis- Raj Thackeray Meet : फडणवीसांच्या मास्टरस्ट्रोकनं ठाकरे बंधुंच्या चर्चांना ब्रेक, भेटीचा अर्थ नेमका काय?
आज सकाळी ९.४० ला राज ठाकरेंची गाडी ताज लँड्सला पोहोचली त्यानंतर १०. ३५ मिनिटांनी त्याच हॉटेलला फडणवीसांची गाडी पोहोचली. जवळपास ११.३४ वाजता याच ठिकाणाहून फडणवीसांची गाडी बाहेर पडली.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे अचानक मुंबईतील वांद्रयाच्या ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये तासभर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या मास्टरस्ट्रोकने ठाकरे बंधुंच्या चर्चांना तुर्तास तरी ब्रेक मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा अर्थ नेमका काय? हे समोर येत आहे. राज ठाकरेंना पुन्हा एकदा महायुतीत घेण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा असून मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी ही भेट असावी का? तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुती आणि राज ठाकरेंमध्ये झालेले मतभेद मिटवण्यासाठी ही भेट होती अशी चर्चा आहे.

