36 जिल्हे 72 बातम्या | 6.30 PM | 3 November 2021
आपल्याच घरातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या व्यक्तींना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवलं. त्यांना चांगल्या ताटात जेवणं दिलं नाही. त्यांच्या अंथरायच्या पांघरायच्या गोधड्या जाळल्या. त्यांच्या हाताला स्पर्श होणार नाही, इतकं फटकून त्यांच्याशी वागले. इथं हात लावू नको, तिथं हात लावू नका.. अशी सगळी कोरोना काळात परिस्थिती होती. पण मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर लस कशाला घ्यायची”, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.
कोरोना लसीकरणाच्या मुद्द्यावरुन कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी केलेल्या एका वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “कोरोना काळात शिक्षित लोकांनी चुकीचं वर्तन केलं. आपल्याच घरातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या व्यक्तींना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवलं. त्यांना चांगल्या ताटात जेवणं दिलं नाही. त्यांच्या अंथरायच्या पांघरायच्या गोधड्या जाळल्या. त्यांच्या हाताला स्पर्श होणार नाही, इतकं फटकून त्यांच्याशी वागले. इथं हात लावू नको, तिथं हात लावू नका.. अशी सगळी कोरोना काळात परिस्थिती होती. पण मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर लस कशाला घ्यायची”, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.
त्याचबरोबर, रामायणाचा दाखला देत इंदोरीकर महाराजांनी टोला लगावला आहे. राम वनवासाला गेला तेव्हा त्यानं सीतेला सोबत नेलं होतं. आता राम क्वारंटाईन झाला तर सीतेन डोकवून पाहिलं नाही, डोकवून, असं इंदोरीकर म्हणाले.
कोरोना आणि लसीविषयी अधिक स्पष्टीकरण देताना ते उपस्थितांना म्हणतात, “कोरोना काळात अनेकांचं निधन झालं, ज्यातली निम्मी माणसं हे टेन्शनने गेली. प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर ही वेगवेगळी आहे. प्रत्येकालाच कोरोना होत नसतो. कोरोनावर मन खंबीर ठेवणं हाच उपाय आहे”, असंही ते म्हणाले.
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर

