AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

36 जिल्हे 72 बातम्या | 36 Jillhe 72 News

36 जिल्हे 72 बातम्या | 36 Jillhe 72 News

| Updated on: Sep 26, 2022 | 7:07 PM
Share

याचबरोबर राज्यात थैमान घालणाऱ्या लम्पीच्या पार्श्वभूमीवर 81 लाख लसींचा पुरवठा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्यासाठी 1 कोटींचा निधी ही देण्यात आला आहे

राज्यात शिवसेना विरूद्ध शिंदे गट असे चित्र अधिक गडद होत आहे. तर शिंदे गटाविरोधात सेना नेत्यांकडून टीक ही होताना दिसत आहे. यादरम्यान आमच्या गाड्यांना फक्त हात लावून दाखवा असे आवाहन आमदार संतोष बांगर यांनी दिले होते. त्यानंतर अमरावती येथे ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यांवर हल्ला केला. त्याविरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे. तसेच 11 शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यावेळी राज्यात मराठा आरक्षणावरून अरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी वक्तव्य केलं आहे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास आपण राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे. याचबरोबर राज्यात थैमान घालणाऱ्या लम्पीच्या पार्श्वभूमीवर 81 लाख लसींचा पुरवठा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्यासाठी 1 कोटींचा निधी ही देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात म्हशीनं पांढऱ्या रेडकूला जन्म दिल्याची आश्चर्याची घटना समोर आली आहे. ज्यामुळे परिसरातील नागरिक रेडकू बघायला गर्दी करू लागले आहेत. तर शारदीय नवरात्रनिमित्त कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

Published on: Sep 26, 2022 07:07 PM