36 जिल्हे 50 बातम्या | 27 October 2021

पुणे महापालिकेचा निवडणूक आखाडा सज्ज होतोय. राजकीय मल्लांच्या जोर बैठका सुरु झाल्यात. पुण्यात काल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते सचिन अहिर यांची महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची भेट झाली. तर संध्याकाळी चंद्रकांंत पाटलांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला गुंडांच्या बायकांनी हजेरी लावली. गुंडांच्या सौभाग्यवतींनी चंद्रकांत पाटलांचा सत्कारही केला.

पुणे महापालिकेचा निवडणूक आखाडा सज्ज होतोय. राजकीय मल्लांच्या जोर बैठका सुरु झाल्यात. पुण्यात काल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते सचिन अहिर यांची महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची भेट झाली. तर संध्याकाळी चंद्रकांंत पाटलांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला गुंडांच्या बायकांनी हजेरी लावली. गुंडांच्या सौभाग्यवतींनी चंद्रकांत पाटलांचा सत्कारही केला. पुण्यात या प्रसंगावरुन मोठा गदारोळ झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला होता.  पासेस वगैरे नव्हते, असं म्हणत त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात काल (बुधवार) चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शहर भाजपतील महत्त्वाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. पण कार्यकर्त्यांबरोबर गँगस्टर गुंडांच्या सौभाग्यवतींनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्याचबरोबर संदीप मोहोळच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या संतोष लांडेची पत्नी गायत्री लांडे यांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन करत चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI