4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 18 October 2021

केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमधल्या अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकल्या जात आहे. पण ईडी-फिडी काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही.

राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या धाडी आणि छापेमारीच्या सत्रावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. तर दुसऱ्या बाजूला ईडी, सीबीआय अशा यंत्रणांकडून त्रास दिला जात आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागानं अन्य लोकांना त्रास दिला. आता अजित पवार आणि त्यांच्या बहिणींना त्रास दिला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केलाय.

केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमधल्या अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकल्या जात आहे. पण ईडी-फिडी काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही. आता सत्ता त्याच्या हातात आहे म्हणून ते काही करत आहेत. हे फार दिवस चालत नाही. देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे, असं आवाहनही शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना केलंय. ज्याच्या हातात सत्ता दिली त्यांनी शहराचं वाटोळं केलं. त्यांना खड्यासारखं बाजूला करा. ज्यांनी शहर घडवलं त्या राष्ट्रवादीच्या हातात पुन्हा सत्ता द्या, असंही पवार यावेळी म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI