4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 PM | 29 November 2021

कोविडच्या ओमायक्रॉन या विषाणुच्या प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असे सांगितले. तसंच राज्यात निर्बंध लावावे की लावू नये? नवी नियमावली काय असेल? यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करावी असंही ठरलं. 

महाविकासआघाडी सरकारची आज महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत एकूण 4 निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेची सदस्य संख्या वाढणार, ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ, महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ, राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात मान्यता या निर्णयांचा समावेश आहे.

कोविडच्या ओमायक्रॉन या विषाणुच्या प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल व संसर्गाला वेळीच रोखण्यात यश मिळेल असे सांगितले. तसंच राज्यात निर्बंध लावावे की लावू नये? नवी नियमावली काय असेल? यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करावी असंही ठरलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI