राज्यसभेच्या 3 जागांसाठी भाजपकडून 6 नावं चर्चेत, कुणाची लागणार वर्णी? ऐनवेळी कुणाचा पत्ता कट?
राज्यसभेच्या 3 जागांसाठी भाजपकडून नारायण राणे, विनोद तावडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांची नावं चर्चेत आहे यापैकी ३ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
मुंबई, ९ फेब्रुवारी, २०२४ : राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून ६ जागांची निवड होणार आहे. त्यापैकी भाजपच्या तीन जागा असणार आहेत. या तीन जागांसाठी सहा जणांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये पंकजा मुंडे यांच्या नावाची वर्णी लागेल का याची ही चर्चा होतेय. याकरता इच्छुक असणारे नेते फिल्डिंग लावताय. २७ फेब्रुवारी रोजी देशात ५६ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. यापैकी ६ खासदार राज्यसभेत जाणार आहे. तर भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन, काँग्रेसचे कुमार केतकर, ठाकरे गटाचे मंत्री अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांची खासदारकीची टर्म संपणार आहे. राज्यसभेच्या 3 जागांसाठी भाजपकडून नारायण राणे, विनोद तावडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांची नावं चर्चेत आहे यापैकी ३ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!

