अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानं माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक चर्चेत, 85 वर्षांच्या तावरे आजोबांनी दादांचं चॅलेंज स्वीकारलं
अजितदादांच्या एका वक्तव्याने माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक चर्चेत आली. 85 वर्षांचा दाखला देत प्रतिस्पर्धी चंद्रराव तावरे यांना अजित पवार यांनी आव्हान दिले आहे आणि आता तावरे यांनी अजित पवार यांचा आव्हान स्वीकारलंय.
बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. अजित पवारांनी मीच चेअरमन असणार असं सांगून प्रतिष्ठा पणाला लावली आहे आणि आता चंद्रराव तावरे यांच वय सांगून अजित पवार आव्हान देताय.
सध्या अजित पवार यांच्याच पॅनलकडे माळेगाव कारखाना होता. तर 1997 आणि 2015 मध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या ताब्यात कारखाना होता. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 22 जूनला निवडणूक आहे. एकूण 19 हजार 750 सभासद मतदान करणार आहेत. 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत. अजित पवार यांचे श्री नीळकंठेश्वर पॅनल शरद पवार यांच बळीराजा पॅनल चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरुशिष्यांच सहकार बचाव शेतकरी पॅनल तर कष्टकरी शेतकरी पॅनलसह काही अपक्ष आहेत पण मुख्य लढत ही अजित पवार यांच्या श्री नीळकंठेश्वर पॅनल आणि चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलमध्येच आहे.
अजित पवार तावरे यांचं वय काढत असल्याने आता तावरे यांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर लावून व्हाट्सअप वर स्टेटस ठेवले आहे. ज्यात अजित पवार यांना मेसेज देण्यात आला की, बडी से बडी हस्ती मिट गयी हमे झुकाने में बेटा तू तो कोशिश भी मत करना तेरी उमर गुजर जायेगी हमे गिराने में…

