AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajasthan Breaking | राजस्थानमध्ये मिग 21 बाइसन विमानाचा अपघात

| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 8:48 PM
Share

मिग-21 फायटर जेट क्रॅश झाल्यानंतर एका शेतात पडलं. मिळालेल्या माहितीनुसार पायलट सुरक्षित आहे. या दुर्घटनेनंतर वायूसेनेच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. तर तिथल्या स्थानिकांकडून पाण्याचा मारा करुन आग विझवण्यात आली.

नवी दिल्ली : राजस्थानच्या बाडमेर (Barmer) जिल्ह्यात भारतीय वायूसेनेचं (Indian Air Force) एक फायटर जेट मिग-21 बायसन क्रॅश झालं आहे. मिग – 21 बायसनच्या क्रॅश ( MiG-21 Crash) होत असतानाच पायलटने विमानातून उडी घेतली. त्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. या अपघातानंतर आता कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे (Court of inquiry ordered) आदेश देण्यात आले आहेत. मिग-21 फायटर जेट क्रॅश झाल्यानंतर एका शेतात पडलं. मिळालेल्या माहितीनुसार पायलट सुरक्षित आहे. या दुर्घटनेनंतर वायूसेनेच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. तर तिथल्या स्थानिकांकडून पाण्याचा मारा करुन आग विझवण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार फायटर जेट कोसळलं त्या ठिकाणी काही झोपड्या होत्या. फायटर जेट कोसळलं आणि घासत काही अंतरावर गेल्यानं बाजूला असलेल्या झोपड्यांना आग लागली. दरम्यान, या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळतेय.