‘प्रदुषण होणार नसेल तरच रिफायनरीला मान्यता’- Aditya Thackeray
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी नाणार प्रकल्पावर (nanar refinery) मोठं विधान केलं आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी नाणार प्रकल्पावर (nanar refinery) मोठं विधान केलं आहे. गेल्या सहा सात महिन्यापासून रिफायनरीवर चर्चा होत आली आहे. परत परत प्रस्ताव येत असतात. कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला (environment) काही हानी होणार नाही याची दक्षता घेऊनच आपण पुढे जाऊ. थोडं प्लानिंग करून पुढे जाऊ. रिफायनरी प्रकल्पासाठी जागा शोधायचा प्रयत्न सुरू आहे. वाड्या वस्त्या नसतील, गावं नसतील अशा जागा शोधत आहोत. कुठेही प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊनच तो प्रकल्प आला तर आम्ही त्याला पुढे मान्यता देऊ, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प मार्गी लागण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मीडियाशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

