Pramod Sawant यांच्या साखळी मतदारसंघात Aaditya Thackeray घेणार जाहीर सभा
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) हे आज गोव्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार आहेत. आदित्य ठाकरे उद्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (pramod sawant) यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत.
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) हे आज गोव्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणार आहेत. आदित्य ठाकरे उद्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (pramod sawant) यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. त्यानंतर ते गोव्यातील (Goa Assembly Election 2022) शिवसेनेच्या इतर उमेदवारांसाठीही प्रचार करणार आहेत. उद्याही आदित्य ठाकरे गोव्यात असतील. उद्या त्यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडी करून लढत असले तरी दोन्ही पक्षांचा जाहीरनामा वेगवेगळा प्रसिद्ध होणार आहे. गोव्यातील प्रत्येक मतदारसंघाचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळेच आम्ही वेगवेगळा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांच्या गोवा दौऱ्याचीही माहिती दिली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

