Goa Assembly Election 2022 : पर्रिकर विरुद्ध पर्रिकर कार्ड? पंतप्रधान मोदी म्हणाले, गोव्यात येतो तेव्हा…!

पंतप्रधान मोदी यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांची आठवण काढली. जेव्हा कधी मी गोव्यात येतो तेव्हा मनोहर पर्रिकर यांची कमतरता भासते. तुम्हा गोवेकरांना तर त्यांची कमतरता नेहमी भासत असेल, असं मोदी म्हणाले.

Goa Assembly Election 2022 : पर्रिकर विरुद्ध पर्रिकर कार्ड? पंतप्रधान मोदी म्हणाले, गोव्यात येतो तेव्हा...!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 8:08 PM

पणजी : गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) प्रचाराच्या रणधुमाळीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सहभागी झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात कोकणीतून केली. त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांची आठवण काढली. जेव्हा कधी मी गोव्यात येतो तेव्हा मनोहर पर्रिकर यांची कमतरता भासते. तुम्हा गोवेकरांना तर त्यांची कमतरता नेहमी भासत असेल, असं मोदी म्हणाले. त्याचबरोबर प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या युवा नेतृत्वात गोव्याच्या गोल्डन भविष्यासाठी विकासाची ही यात्रा निरंतर सुरु राहील. 14 फेब्रुवारीला गोव्याचा प्रत्येक मतदार भाजपचं कमळ फुलवण्यासाठी मतदान करणार आहे. मी गोवा भाजपच्या सर्व उमेदवारांना भव्य विजयाच्या शुभेच्छा देतो, असा दावा करत पंतप्रधान मोदी यांनी विजयाचा दावा केलाय.

जेव्हा कधी मी गोव्यात येतो तेव्हा मनोहर पर्रिकर यांची कमतरता नेहमी भासते. तुम्हा गोवेकरांना तर त्यांची कमतरता अजूनच भासत असेल. मी भाजपचे वरिष्ठ नेते फ्रान्सिस डिसुझा यांच्यासोबतही मला काम करण्याची संधी मिळाली. ते गोवा संस्कृती आणि भाजप विचाराचे सच्चे प्रतिनिधी राहिले. माझ्या जिवनातील महत्वपूर्ण क्षण गोव्याच्या मातीतूनच सुरु झाले.आज तुम्ही मला ज्या रुपात पाहत आहात त्याची सुरुवात गोव्यातून झाली होती. जून 2013 मध्ये इथं भाजपची कार्यसमिती पार पडली. तेव्हा मी गोव्याच्या याच धरतीवर होतो. तेव्हा भाजपनं मला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसमितीचा प्रमुख घोषित केलं होतं. नंतर मला पंतप्रधान पदाचा उमेदवारही घोषित करण्यात आलं. गोव्याच्या मातीतून निघालेली ती प्रेरणा होती. त्या दिवशी आमच्या पर्रिकरांनी एक सभा आयोजित केली होती. तेव्हा माझ्या तोंडून सहज एक शब्द आला होता काँग्रेसमुक्त भारत… आज हा शब्द देशाच्या कोट्यवधी नागरिकांचा संकल्प बनला आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आणि पणजी विधानसभेतून भाजपविरोधात शड्डू ठोकलेले उत्पल पर्रिकर यांचा उल्लेख मात्र टाळला.

‘भाजपनं गोव्यात समग्र विकासाचा मुद्दा मांडला’

मोदी पुढे म्हणाले की, ‘गोव्याची आपली एक खास संकृती आहे. गोवा सगळ्यांना सोबत घेऊन जातो. ज्यांना गोव्याच्या संस्कृतीशी काही देणघेणं नाही. त्यांनी गोव्याला भ्रष्टचाराचं एटीएम बनवलं होतं. भाजपनं गोव्यात समग्र विकासाचा मुद्दा मांडला. कारण विकासाला तुकड्यात जात, धर्म, भाषा, श्रेत्राच्या नावाने वाटलं जाऊ शकत नाही. साऊथ गोवा आणि नॉर्थ गोव्यात एकत्र काम झालं पाहिजे’.

‘गोव्यात मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क बवण्याचं काम सुरु’

‘जेव्हा आम्ही गोव्याच्या पर्यटनाचा मुद्दा उपस्थित करतो. तेव्हा अन्य क्षेत्राचा मुद्दाही उपस्थित होते. त्यामुळे भाजपनं इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाचं नवं अभियान राबवलं आहे. गोव्या स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे अनेक कामं सुरु आहेत. बस डेपो, आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम सुरु आहे. यामुळे गोव्यात दुसऱ्या उद्योगात, व्यापारात गुंतवणुकीचे मार्ग उघडतील. गोव्यात एक मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क बवण्याचं काम सुरु आहे. गोव्यात भाजप सरकार आज जे काम करत आहे. त्याची गरज गोव्याला दशकांपूर्वी होती’, असा मुद्दाही मोदींनी आपल्या भाषणात उपस्थित केला.

‘त्यांना गोव्याची आठवण सैर करण्यासाठीच यायची’

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर निशाणा साधला. ‘केंद्रातही यापूर्वी अनेक सरकारं आली. पण गोव्याचं महत्व लक्षात घेऊन कार्य केलं गेलं नाही. गोव्याला विकास केला तर भारताला मोठा फायदा होईल हे त्यांच्या डोक्यात कधी आलं नाही. तेव्हा खुर्चीवर असणाऱ्यांना गोव्याची आठवण तेव्हा यायची जेव्हा त्यांना सैर करायची असेल. गोव्यात सागरमाला प्रकल्पाअंतर्गत 5 हजार कोटीची गुंतवणूक केली जातेय. आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी विसा ऑन अरायव्हल हा त्याचाच एक भाग आहे. गोव्याच्या पर्यटनासाठी केंद्रानं गोव्यात 100 पेक्षा अधिक इंटरसिटी बसेसला परवानगी दिली आहे’, अशी माहिती मोदींनी यावेळी दिली.

इतर बातम्या :

Hijab : कर्नाटक हायकोर्टाचा हिजाबवाल्यांना पहिला झटका, कोर्ट म्हणालं, निकाल येईपर्यंत ‘नो’ धार्मिक पोषक

Fact Check : पंतप्रधान मोदींना हृदयनाथ मंगेशकरांबद्दल चुकीची माहिती? आकाशवाणीतून मंगेशकरांना खरंच काढून टाकलं होतं?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.