Nadim Patel : सत्तारांना मंत्रिपद मिळावं अन्यथा आत्महत्याच, समर्थकाचा इशारा

उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना अब्दुल सत्तार यांचे नाव शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये आले आहे. अब्दुल सत्तार हे सिल्लोड मतदार संघाचे आमदार आहेत. आणि त्यांना जर मंत्रिपदाबाबत न्याय मिळाला नाही तर आपण मंत्रालय किंवा मुख्यमंत्र्यांचा असलेला वर्षा बंगल्यासमोर आत्महत्या करणार असल्याचे नदीमने सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

दत्ता कानवटे

| Edited By: राजेंद्र खराडे

Aug 08, 2022 | 7:26 PM

औरंगाबाद : टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार यांचे नाव आल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरुन त्यांच्या मंत्रिपदाबाबतही साशंका उपस्थित होत असतानाच सत्तारांचा एक समर्थक पुढे आला आहे. आ. अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद न मिळाल्यास आपण आत्महत्याच करणार असल्याचा इशारा त्याने दिला आहे. विरोधकांकडून अब्दुल सत्तार यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे यामध्ये काही तथ्य नसून जर त्यांना मंत्रिपद मिळाले नाहीतर आपण आत्महत्या करणार असल्याचा इशाराच नदीम पटेल या त्यांच्या समर्थकाने दिला आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना अब्दुल सत्तार यांचे नाव शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये आले आहे. अब्दुल सत्तार हे सिल्लोड मतदार संघाचे आमदार आहेत. आणि त्यांना जर मंत्रिपदाबाबत न्याय मिळाला नाही तर आपण मंत्रालय किंवा मुख्यमंत्र्यांचा असलेला वर्षा बंगल्यासमोर आत्महत्या करणार असल्याचे नदीमने सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें