Disha Salian Case : आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा? दिशा सालियन मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, घातपात नाही तर… SIT नं काय म्हटलंय?
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर एसआयटीमध्ये तपास अधिकारी असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकरांकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणी एसआयटीने आपल्या प्रतिज्ञापत्रात मोठी माहिती देत दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोणताही घातपात नसल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणी करण्यात येणारे आरोप निराधार असल्याचे एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. महायुती सरकारने बनवलेल्या एसआयटीकडून हायकोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. दरम्यान, दिशा सालियनचे वडील सतिश सालियन यांनी या प्रकरणासंदर्भातील याचिका योग्य नसून ती फेटाळावी, असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय. तर माझ्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हणत ही याचिका फेटाळून लावा, अशी मागणी करत आदित्य ठाकरेंनी कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी घातपात दिसत नाही. मृत्यूआधी ती मद्यधुंद अवस्थेत होती, वैद्यकीय अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा नसल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?

