अजित पवार यांच्यानंतर शरद पवारही भाजपसोबत येणार? अन् अजितदादा मुख्यमंत्री होणार? कुणी केला दावा?
tv9 marathi Special Report | अजित पवार याचं भाकीत खरं ठरलं, अजित पवार यांच्यानंतर आता येत्या १५ ते २० दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शरद पवारही इंडियाऐवजी एनडीएमध्ये येणार आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार आसल्याचा मोठा दावा अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला
मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | अपक्ष आमदार रवी राणा यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याबाबत मोठं भाकित केले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ सुरू झालीये. तर रवी राणा यांच्या दाव्यानंतर विरोधकांनी पलटवार केलाय. अजित पवार यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शरद पवारही भाजपसोबत सत्तेत सहभागी होतील, असा दावा रवी राणा यांनी केला. इतकंच नाही तर त्यांनी याचा कालावधीही सांगितला आहे. अजित पवार यांच्याबद्दल भाकीत करताना रवी राणा म्हणाले, राजकारणात काहीही शक्य आणि अशक्य नसल्याचे सांगत अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात. असं भाकित राणा यांनी केले आहे. रवी राणा यांच्या दाव्यानंतर विरोधकांनी त्यांना प्रत्युत्तर नाही दिलं तर नवलंच…ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी राणा यांना खोचक टोला लगावत म्हटले की, रवी राणा यांनी भाष्य करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती का?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

