AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmedabad Plane Crash : आम्ही जेवत होतो, अचानक सगळीकडे धूळ उडाली आणि.. ; विमान दुर्घटनेतल्या विद्यार्थ्यानी सांगितली आखोंदेखी

Ahmedabad Plane Crash : आम्ही जेवत होतो, अचानक सगळीकडे धूळ उडाली आणि.. ; विमान दुर्घटनेतल्या विद्यार्थ्यानी सांगितली आखोंदेखी

Updated on: Jun 13, 2025 | 11:11 AM
Share

BJ Medical College : अहमदाबाद विमान दुर्घटनेत हे एयर इंडियाचं हे विमान मेघानी येथील ज्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहाच्या इमारतीवर कोसळलं त्याठिकाणच्या विद्यार्थ्यानी अपघाताची आपबिती सांगितली.

अहमदाबाद विमान दुर्घटना घडली त्यावेळी फ्लाईट एआय 171 अहमदाबादमध्ये असलेल्या मेघानी येथील नागरी वसाहतीत कोसळली. जय इमारतीवर हे विमान कोसळलं ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहाची इमारत होती. याठिकाणी जवळच असलेल्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाच्या इमारतीत या विमानाचा पुढचा भाग घुसला. त्यामुळे यात तब्बल 24 भावी डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक विद्यार्थी जखमी आहेत. ज्या भागात विमान घुसले तिथे विद्यार्थ्यांची जेवणाची खोली होती. हा अपघात झाला तेव्हा अनेकजण याठिकाणी जेवण करत होते. अचानक झालेल्या या अपघाताने एकच गोंधळ उडाला. या अपघातात जे विद्यार्थी वाचले त्यांनी आपला अनुभव टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितला आहे.

दरम्यान, हे विद्यार्थी म्हणाले की, आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो की आम्ही या अपघातातून वाचलो. ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा नेमकं काय झालं तेच कळालं नाही. पहिले सगळ्यांना वाटलं की सिलेंडरचा स्फोट झाला. सगळीकडे धूळ आणि धूर पसरलेलं होतं. काहीच समजत नव्हतं. आमचे अनेक मित्र यात अडकले होते. आम्ही त्यांना वाचवण्यासाठी धावलो. जसं शक्य होईल तसं आम्ही त्यांना या मलब्यातून काढून उपचारासाठी घेऊन गेलो. यात मृत झालेले विद्यार्थी यांचे सहकारी होते. आमच्या डोळ्यांसमोर आम्ही त्यांचा हा अपघात पहिला, अशीही दु:खद भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

Published on: Jun 13, 2025 11:11 AM