Ahmedabad Plane Crash LIVE : अपघातानंतर विमान थेट वसतिगृहावर कोसळलं अन् 20 विद्यार्थ्यांनी जीव गमावला
Plane Crash LIVE : अहमदाबाद विमान अपघातात ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाची इमारत होती. या भीषण अपघातात 20 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला आहे.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान ज्यावेळी कोसळलं त्यावेळी त्यात कोसळण्यापूर्वीच आग लागली होती. त्यामुळे या विमानाचे बरेच भाग ठिकऱ्यांसारखे उडाले आणि आजूबाजूच्या वसाहतीत घुसले. तर ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं त्याला देखील आग लागली आहे. या इमारतीत वैद्यकीय विद्यार्थ्यांचे वसतीगृह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या वसतिगृहातल्या 20 विद्यार्थ्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. मेघानी नगरात हे विमान कोसळलं त्याच भागात बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचं वसतिगृह आहे. अपघातात विमान थेट वसतीगृहाच्या इमारतीवर कोसळल्यामुळे या अपघातात प्रवाशांसोबतच तब्बल 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विमानाचा मागील भाग वसतीगृहाच्या इमातीवर लटकत असल्याचं सध्या दिसून येत आहे. तर विमानाच्या समोरचा भाग पूर्णपणे जळून गेला आहे.

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले

मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल
