एकदा जर मी तोंड उघडलं ना… बारामतीत भावकीतच जुंपली, अजित दादांनी कुणाला अन् काय दिला इशारा?
'तुमचा भाऊ निवडणुकीत होता तेव्हा तुम्हाला नाही फिरावंस वाटलं...हे सगळं घटकेचं आहे. पावसाळ्यात कसं छत्र्या उगवतात ना तसंय... मी फार तोलून मापून बोलतोय. एकदा जर मी तोंड उघडलं ना.. फिरता येणार नाही. तोंड पण दाखवता येणार नाही.. ', अजित पवार यांचा इशारा काय?
माझ्या निवडणुकीत माझी भावंड कधी फिरली नाहीत मात्र आताच्या निवडणुकीत माझी भावंड गरागरा फिरत आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी करत श्रीनिवास पवार आणि राजेंद्र पवार यांच्यावर अजित पवार यांनी हल्लाबोल केलाय. अजित पवार म्हणाले, ‘तुमचा भाऊ निवडणुकीत होता तेव्हा तुम्हाला नाही फिरावंस वाटलं…हे सगळं घटकेचं आहे. पावसाळ्यात कसं छत्र्या उगवतात ना तसंय… मी फार तोलून मापून बोलतोय. एकदा जर मी तोंड उघडलं ना.. फिरता येणार नाही. तोंड पण दाखवता येणार नाही.. ‘, असं म्हणत अजित पवारांनी एकप्रकारे आपल्या भावांना इशाराच दिला. तर यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांनाही टोले लगावले. ‘तुम्ही म्हणाल ते १०० टक्के खरं…आणि आमची भूमिका चुकीची…तुम्ही म्हणाले २०१४ ला पाठिंबा द्या, नंतर म्हणाले माघार घ्या… २०१९ ला पुन्हा पाठिंबा द्या म्हणाले, नंतर माघार म्हणाले…असं नाही चालत…’, असं वक्तव्य करत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?

