अजित पवार गटातील ‘हे’ नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर काल झालेल्या अजित पवार गटाच्या बैठकीत काल चर्चा करण्यात आली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे थेट दिल्लीत वरिष्ठांकडे भाजप नेत्यांची तक्रार करणार आहे.
अजित पवार गटाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीमध्ये तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांमुळे अजित पवार गट अर्थात राष्ट्रवादीत नाराजीचं वातावरण पसरलं असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यासह काही नेते धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. भाजप नेत्यांच्या काही नेत्यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा दादा गटाचा आरोप आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करण्यात येणार असल्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर दादा काय तक्रार करणार हे त्यांना विचारलं पाहिजे, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे अजित पवार गट आणि भाजप यांच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.