Loksabhecha Mahasangram : आम्ही अचानक भाजपात गेलो नाही तर २०१४ पासून… सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट
'२०१४ चे निकाल हाती येत होते. भाजप मोठा पक्ष झाला होता. त्यावेळी चारही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढलेले होते. त्यावेळी आम्ही भाजपने न मागताच बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यामुळे आम्ही आज भाजपसोबत गेलो ते अचानक गेलो असं नाही. त्याची सुरुवात...' सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट काय?
मुंबई, १ मार्च २०२४ : आज आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून बहुजनांच्या हितासाठी भाजपसोबत गेलो, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. पुढे ते म्हणाले, त्यावेळी वेगळं काही तरी घडलं हे दाखवण्याचा राज्यात प्रयत्न होत आहे. २०१४ चे निकाल हाती येत होते. भाजप मोठा पक्ष झाला होता. त्यावेळी चारही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढलेले होते. त्यावेळी आम्ही भाजपने न मागताच बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यामुळे आम्ही आज भाजपसोबत गेलो ते अचानक गेलो असं नाही. त्याची सुरुवात २०१४ पासून झाली. दादाला टेक इट ग्रँटेड असं समजलं नाही. दादा काही नाहीच असं म्हटलं जातं. टेक ऑफ करताना काही तरी लागतं. पण नंतर कर्तृत्व लागतं. ४३ आमदार सोबत येतात हे कर्तृत्व आहे म्हणूनच आले. त्यांचा विश्वास आहे म्हणूनच आहे. त्यांनी असामान्य भूमिका घेतली म्हणूनच त्यांच्यासोबत गेलो. २०१४ पासून भाजपला जाण्याची सुरुवात ही पक्षनेतृत्वाचा होता. तो अजितदादांचा नव्हता. नंतर निर्णय बदलला. नाही तर आम्ही त्या सरकारमध्ये गेलो असतो. त्यानंतर शिवसेनेने भाजपसोबत युती केली. त्यावेळी शिवसेनेला फक्त १० जागा मिळाली. राष्ट्रवादीत संघर्ष नव्हताच. भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्वोच्च स्तरावर झाला. तो केवळ २०१४ लाच नव्हे तर २०१६ लाही तोच निर्णय झाला होता, असे त्यांनी सांगितले.
Published on: Mar 01, 2024 12:24 PM
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
