Video: सगळ्यांना सगळीकडे कार्यालयं उघडण्याचा अधिकार, आम्हीपण महाराष्ट्राचं कार्यालय यूपीत उघडू- अजित पवार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी महाराष्ट्रात मुंबईत यूपी सरकारचं कार्यालय उभारण्याची घोषणा केली, त्यानंतर यामागे नेमकी काय राजकीय गणितं आहेत, यासंबंधीचे तर्क वितर्क काढले जात आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला यापासून काय धोका आहे, याचाही अंदाज बांधला जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar)यांनी मात्र या शक्यता फेटाळून लावत यात […]

आयेशा सय्यद

|

May 12, 2022 | 2:39 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी महाराष्ट्रात मुंबईत यूपी सरकारचं कार्यालय उभारण्याची घोषणा केली, त्यानंतर यामागे नेमकी काय राजकीय गणितं आहेत, यासंबंधीचे तर्क वितर्क काढले जात आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला यापासून काय धोका आहे, याचाही अंदाज बांधला जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar)यांनी मात्र या शक्यता फेटाळून लावत यात काहीही घाबरण्यासारखे कारण नाही. कुणी कुठं कार्यालय काढावं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्हीपण महाराष्ट्राचं कार्यालय यूपीत उघडू. सगळ्यांना सगळीकडे कार्यालयं काढण्याचा अधिकार आहे, असा पलटवार अजित पवार यांनी केला. मुंबईत आज पत्रकारांशी ते बोलत होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील या मुद्द्यावर अशीच प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातले अनेक पर्यटक युपीत जात असतात, त्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सरकारदेखील तेथे कार्यालय सुरु करणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें