Ajit Pawar : …तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल, विरोधी पक्षनेते अजित पवारांचं विधान

Ajit Pawar : महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत असताना विरोधी पक्षाकडून वारंवार सरकार पडण्याच्या तारखा दिल्या जायच्या. आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारच्या भविष्यावर भाष्य केलंय.

शुभम कुलकर्णी

|

Aug 15, 2022 | 12:16 PM

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ध्वजारोहणानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या भविष्यावर भाष्य केलंय. हे एक मोठं वक्तव्य त्यांनी केलंय. अजित पवार म्हणाले की, ‘कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठिशी 145 आमदारांचा (MLAs) आकडा आहे. तोपर्यंत शिंदे-फडणवीस सरकार चालेल. पण, ज्यावेळी आमदारांची संख्या कमी होईल, त्या दिवशी हे सरकार गडगडेल, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांनी ध्वजारोहणानंतर माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं. महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत असताना त्यावेळचा विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या (BJP)  नेत्यांकडून देखील सरकार पडण्याच्या तारखा वारंवार दिल्या जात होत्या. तसाच प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें