Dhananjay Munde Video : धंनजय मुंडेंचं मंत्रिपद कोणाला मिळणार? अजित पवारांकडून मोठी खेळी
धनंजय मुंडे यांच मंत्रिपद अजित पवार हे स्वतःकडे ठेवणार असल्याची मोठी माहिती समोर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय हे खातं अजितदादा स्वतःकडे ठेवणार असल्याचं कळतं आहे. दरम्यान, पक्षांतर्गत वाद वाढू नयेत त्यासाठी ही खेळी असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच मंत्रिपद दादा स्वतःकडे ठेवणार असल्याची चर्चा आता होत आहे. […]
धनंजय मुंडे यांच मंत्रिपद अजित पवार हे स्वतःकडे ठेवणार असल्याची मोठी माहिती समोर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय हे खातं अजितदादा स्वतःकडे ठेवणार असल्याचं कळतं आहे. दरम्यान, पक्षांतर्गत वाद वाढू नयेत त्यासाठी ही खेळी असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच मंत्रिपद दादा स्वतःकडे ठेवणार असल्याची चर्चा आता होत आहे. धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा या मंत्रिपदाचा कार्यभार सोडल्यानंतर त्यांच्या या मंत्रिपदावर राष्ट्रवादी पक्षाकडून कोण जाणार या संदर्भात चर्चा सुरू होती. अशातच प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित या आमदारांच्या नावाची चर्चा सुरू होती. तर मराठा आमदाराला मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यताही वर्तविली जात होती. मात्र पक्षात पक्षांतर्गत कोणतीही नाराजी वाढू नये. त्यामुळे या खात्याचा कार्यभार अजित पवार हे स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती आता समोर येत आहे.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी

