Dhananjay Munde Video : मुंडेंच्या जागी बीड जिल्ह्यातील आमदारालाच मंत्रिपद? मराठा आमदाराची लागणार वर्णी? ‘या’ नावाची चर्चा
धनंजय मुंडे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या जागी बीड जिल्ह्यातील आमदारालाच मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोणाची लागणार वर्णी?
धनंजय मुंडे यांच्या जागी बीड जिल्ह्यातील आमदारालाच मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित या आमदारांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार हे मंत्रिपदासाठी बीडमधीलच चेहरा देणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच मराठा आमदाराला मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यताही वर्तविली जातेय. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना अखेर 82 दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, धनंजय मुंडे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर आता मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि मनोज जरांगेंकडून केली जात असताना आता धनंजय मुंडे यांच्या जागी बीड जिल्ह्यातील आमदारालाच मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे.