राजकीय नेत्यांच्या हट्टापायी पुणे मेट्रोला 12 वर्षे लागली; अजित पवारांचा आरोप
एमआयटी महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्या अर्थाने दाद दिली पाहिजे. पुणे मेट्रो सुरु करण्यासाठी जवळपास 12 वर्षे लागली. नितीन गडकरी साहेबांनी वेळोवेळी कठोर भूमिका घेतली आणि त्यामुळे कुठेतरी मेट्रोला सुरुवात झाली.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर एमआयटी महाविद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्या अर्थाने दाद दिली पाहिजे. पुणे मेट्रो सुरु करण्यासाठी जवळपास 12 वर्षे लागली. नितीन गडकरी साहेबांनी वेळोवेळी कठोर भूमिका घेतली आणि त्यामुळे कुठेतरी मेट्रोला सुरुवात झाली. एक गोष्ट मान्य करावी लागेल की, पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना मेट्रो आणि अन्य विकासकामावेळी खूप त्रास सहन करावा लागला. अजूनही काही काळ हा त्रास सहन करावा लागणार आहे. ही विकासकामं अजून काही वर्षे सुरु राहणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

