Vishal Patil : अलमट्टी धरणांच्या उंची विरोधात सांगलीत खासदार विशाल पाटील आक्रमक
Almatti Dam Protest : अलमट्टी धरणाच्या ऊंची वाढी विरोधात खासदार विशाल पाटील आक्रमक झालेले आहेत. आज सांगलीमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.
अलमट्टी धरणाच्या ऊंची वाढी विरोधात खासदार विशाल पाटील आक्रमक झालेले आहेत. आज सांगलीमध्ये चक्काजाम आंदोलन करून अलमट्टी धरणाच्या ऊंची वाढीच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे कर्नाटकच्या अलमट्टी धरणाच्या ऊंचीवाढीचा मुद्दा आता तापलेला बघायला मिळत आहे. सांगलीत पार पडलेल्या विविध संघटनांच्या बैठकीत या चक्काजाम आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आज ही आंदोलन करण्यात आले. अलमट्टी धरणाची ऊंची वाढवण्यास येथील नागरिकांचा विरोध आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज अंकली टोल नाक्यावर हा चक्काजाम केलाआहे. यावेळी खासदार विशाल पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला बघायला मिळाला. या आंदोलनाला विविध संघटनांबरोबरच सांगलीतील नागरिकांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ऊंची वाढवून कोल्हापूर आणि सांगलीतील नदीकाठच्या लोकांना घाबरवलं जात आहे, असा या आंदोलकांचा आरोप आहे.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

