Union Home Minister Amit Shah : गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीनगरमधील पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली. तसंच हल्ला झाला त्या ठिकाणी देखील शाह यांनी भेट दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीनगरमधील पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बैसरन व्हॅलीला पोहोचले. येथे त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसंच जय ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला त्या पहलगामच्या बैसरन खोऱ्यात देखील गृहमंत्री अमित शाह यांनी भेट दिली. अमित शाह हे कालपासून श्रीनगरमध्ये आलेले आहेत. त्यानंतर त्यांनी उच्चस्तरीय बैठक देखील घेतली. जखमी रुग्णांना रुग्णालयात जाऊन भेटले. बैसरन खोऱ्यात अमित शाह यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित आहेत.
दरम्यान काल दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी एनआयएकडून सध्या पाहणी केली जात आहे. एनआयए फॉरेन्सिक टीमकडून पुरावे गोळा करण्यास देखील सुरुवात झाली आहे. घटनास्थळी उपस्थित पर्यटकांचे जबाब देखील नोंदवून घेतले जात आहेत.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

