ते आपले आहेत, मुंबईत त्यांना…; अमित ठाकरेंचं मराठा आंदोलकांसाठी मोठं विधान
मराठा आरक्षण आंदोलनावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आंदोलकांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु सरकारवर आंदोलकांना दिलेल्या आश्वासनांवरून प्रश्न उपस्थित केले आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मनसे नेते अमित ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “मराठा बांधव एक-दोन दिवसांची तयारी करून आंदोलनासाठी आले आहेत. त्यांच्याकडील खाण्याचे सामान, पिण्याचे पाणी आणि औषधे संपली आहेत. ते कोठूनही आले असले, तरी ते आपले आहेत. मुंबईत त्यांना एकटे वाटू देणार नाही. आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू.”
मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेल्याचा आरोप केला होता. यावर अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले, “आम्ही कधी कोणासोबत गेलो? आमची भूमिका स्पष्ट आणि स्वतंत्र आहे. मागच्या वेळी मराठा आंदोलक पनवेलपर्यंत आले आणि परत गेले. त्यांना कोणते आश्वासन देण्यात आले होते? आता ते पुन्हा का आले? ज्यांनी आश्वासने दिली, त्यांना याचा जाब विचारायला हवा, की तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात?”
पुढे बोलताना ते म्हणाले, “आंदोलनात सहभागी झालेले लोक सामान्य आहेत, त्यांना यामागील राजकारण कळत नाही. त्यांच्याकडे अन्न-पाणी संपले आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे गरजेचे आहे.” आंदोलनामुळे मुंबईतील लोकल वाहतुकीवर होणाऱ्या परिणामांबाबत विचारले असता, अमित ठाकरे म्हणाले, “हे प्रश्न सरकारने सोडवावेत. मुंबईकरांना त्रास होत आहे, हे खरे आहे. पण आंदोलक आपली मागणी घेऊन आले आहेत. सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा आणि आंदोलकांना उत्तर द्यावे.”
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

