AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Thackeray : ‘यावेळी तुम्ही आला आहात, तर…’ अमित ठाकरे मराठा आंदोलकांना काय म्हणाले?

Amit Thackeray : "आमची भूमिका स्पष्ट आहे. शेवटी तिथे जी लोकं आहेत, त्यांना त्यामागच राजकारण कळत नाहीय. त्यांच्याकडच अन्न-पाणी संपलय, ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे" असं अमित ठाकरे म्हणाले.

Amit Thackeray : 'यावेळी तुम्ही आला आहात, तर...' अमित ठाकरे मराठा आंदोलकांना काय म्हणाले?
Amit Thackeray
| Updated on: Sep 01, 2025 | 1:30 PM
Share

“आंदोलनाकडे बघतोय. मराठा बांधव एखाद-दोन दिवसांची तयारी करुन आलेले. त्यांच्याकडचं खाण्याच सामन, पिण्याच पाणी संपलय. औषधं संपली आहेत, कुठूनही आले असले, तरी ते आपले आहेत. मुंबईत कुठेही त्यांना एकटं वाटू देणार नाही. मुंबईत कुठेही त्यांना एकटं वाटू नये ही आमची भावना आहे. आम्ही त्यांना मदत करु” असं अमित ठाकरे म्हणाले. राज ठाकरे फडणवीसांसोबत गेले म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली. त्यावर अमित ठाकरे म्हणाले की, “सोबत कधी गेले? आमची भूमिका आमची आहे. आमची भूमिका बदलेली नाही. शेवटी मागच्यावेळी मराठा आंदोलक पनवेलपर्यंत येऊन परत गेले होते. त्यांना काय आश्वासन दिलेलं?” “आता का परत आले? ज्यांनी आश्वासन दिलं, त्यांना विचारायला नको का? तुम्ही कोणाला मूर्ख बनवातय?” असा रोखठोक सवाल अमित ठाकरे यांनी केला.

“आमची भूमिका स्पष्ट आहे. शेवटी तिथे जी लोकं आहेत, त्यांना त्यामागच राजकारण कळत नाहीय. त्यांच्याकडच अन्न-पाणी संपलय, ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे” असं अमित ठाकरे म्हणाले. आंदोलनाकडे कसं बघता? लोकलवर परिणाम होतोय या प्रश्नावर अमित ठाकरे म्हणाले की, “ते सरकारने बघावं. याचं उत्तर सरकारने द्यावं. मुंबईच्या लोकांना त्रास होतोय. पण ते लोक पण आपली एक मागणी घेऊन आलेत, त्यामुळे लवकरात लवकर सरकारने याचं उत्तर द्यावं”

‘आमच्या खांद्यावर बंदूक ठेऊन चालवता’

“तुम्हाला टेक्निकली काय वाटतं, जे मागणी करतायत ते देऊ शकतात का? दरवेळी तुम्ही आमच्या खांद्यावर बंदूक ठेऊन चालवता. मला वाटतं, यावेळी तुम्ही आलात तर तुम्ही जे काही उत्तर आहे, ते घेऊन जा. आरक्षण दिलं तर ते शेवटी शिक्षणात, रोजगारात लागणार, तर ते कसं, कुठे मिळणार? याचं उत्तर घेऊन जा” असं अमित ठाकरे म्हणाले.

फडणवीसांवर होत असलेल्या आरोपावर काय म्हणाले?

फडणवीसांवर आरोप होतोय की, ते समाजात तेढ निर्माण करतायत. “ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांची अजिबात अशी इच्छा नसणार की, मुंबईत किंवा महाराष्ट्रात कुठे काही अनुचित घडावं. आपले मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील” असं अमित ठाकरे म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.