अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला दिली आठवड्याची मुदत

अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला दिली आठवड्याची मुदत

| Updated on: Aug 31, 2026 | 2:40 PM

मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी वसतिगृह, भोजनगृह आणि स्वच्छतागृहातील असुविधा पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या निकृष्ट जेवण आणि अस्वच्छतेबद्दल त्यांनी कॉलेज प्रशासनाला धारेवर धरले. तात्काळ सुधारणा करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील वसतिगृह, भोजनगृह (मेस) आणि स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना अनेक गंभीर समस्या निदर्शनास आल्या. निकृष्ट दर्जाचे जेवण, पाण्यात अळ्या आणि कांदे सडलेले असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. वसतिगृहाची खराब स्थिती, अस्वच्छ स्वच्छतागृहे आणि मुलींसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अनुपलब्धता यावरही अमित ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या गंभीर असुविधांबद्दल त्यांनी कॉलेजच्या अधीक्षकांना चांगलेच धारेवर धरले. सरकारकडून निधी मिळूनही सुविधा का पुरवल्या जात नाहीत, असा सवाल त्यांनी विचारला.

बॅडमिंटन हॉलसारख्या सुविधा बंद का आहेत, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला तंबी दिली. येत्या आठवड्याभरात या सर्व समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे आदेश अमित ठाकरे यांनी दिले आहेत. अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी ठाकरे यांचा हा पुणे दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे.

Published on: Aug 31, 2026 2:40 PM
Follow Us