अमोल कोल्हेंचं अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट माहिती पण…
तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट? हे तुम्हीच ठरवा असा सवाल अजित पवार यांनी मतदारांना करत अमोल कोल्हेंवर टीका केली होती. या टीकेवर अमोल कोल्हे यांनी पलटवार केलाय. कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की...
कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की… असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट? हे तुम्हीच ठरवा असा सवाल अजित पवार यांनी मतदारांना करत अमोल कोल्हेंवर टीका केली होती. पुढे अमोल कोल्हे असेही म्हणाले की, २००१ साली “सांगा उत्तर सांगा” या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून या वास्तूच्या पायऱ्या चढलो ते माझे ‘काका’ अभिनय क्षेत्रात होते म्हणून नाही तर स्वतःच्या टॅलेंट आणि कर्तृत्वाच्या जोरावर.. आणि योगायोगाने आज २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या राजकीय पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी याच वास्तूच्या पायऱ्या चढलो… ते ही काकांच्या नाही तर ‘स्व’कर्तृत्वाच्या जोरावर…असे कोल्हेंनी ट्वीमध्ये म्हटले आहे.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

