Amol Mitkari : कुत्रा चावल्याचा खटला फास्टट्रॅकमध्ये चालवा, फाशी द्या; नाव न घेत मिटकरींचा भिडे गुरुजींना टोला
Amol Mitkari Tweet : अमोल मिटकरी यांनी ट्विट शेअर करत नाव न घेता संभाजी भिडे याना कुत्रा चावल्याच्या प्रकारावरून खोचक टीका केली आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे गुरुजी यांचं नावं न घेता त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्यांना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. तर कुत्रा चावल्याचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे, असं देखील मिटकरी यांनी म्हंटलं आहे. कुत्रा चावतो म्हणजे काय? मोघलाई लागली आहे का? असा खोचक प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
संभाजी भिडे यांना सोमवारी सांगलीत कुत्रा चावला होता. त्यानंतर त्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता अजित पवार यांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील एक ट्विट करत भिडे यांच नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांना चावलेला कुत्रा ‘वाघ्या’ तर नव्हता ना? जो कोणी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटला फास्टट्रॅकवर चालला पाहिजे. चावतो म्हणजे काय? मोघलाई लागली आहे का?’ असा प्रश्न देखील मिटकरी यांनी ट्विटमधून उपस्थित केला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

