अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
अनिल अंबानी समूहाची आणखी 510 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. या कारवाईमध्ये, रिलायन्स कम्युनिकेशन बँक फसवणूक प्रकरणात 247 कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स संबंधित प्रकरणात 263 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
अनिल अंबानी समूहाची आणखी 510 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. या कारवाईमध्ये, रिलायन्स कम्युनिकेशन बँक फसवणूक प्रकरणात 247 कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच, रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स संबंधित प्रकरणात 263 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये दोन चार्टर्ड विमानं, जमिनीचे सहा भूखंड आणि महाराष्ट्रातील एक कार्यालय यांचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त, तमिळनाडूतील दोन पवनचक्क्या, बँक खात्यातील शिल्लक, मुदतठेवी, विविध प्रकारची गुंतवणूक आणि येणं बाकी असलेली रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे. या ताज्या कारवाईनंतर, अनिल अंबानी समूहाविरोधात ईडीने आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तेचा एकूण आकडा सुमारे 23,100 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही कारवाई विविध आर्थिक अनियमितता आणि फसवणूक प्रकरणांच्या चौकशीचा भाग आहे.
