AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 दिवसांत पाणी प्रश्व सोडवा अन्यथा..., ठाकरे गटाचा राज्य सरकारल इशारा

“15 दिवसांत पाणी प्रश्व सोडवा अन्यथा…”, ठाकरे गटाचा राज्य सरकारल इशारा

apeksha sakpal
apeksha sakpal | Updated on: Jun 26, 2023 | 4:09 PM
Share

दुषित पाणी पुरवठा, अपुरी नालेसफाई आणि पायाभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यांवरून आज ठाकरे गटाने थेट मुंबई महापालिकेवर प्रचंड मोठा मोर्चा काढला. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अनिल परब यांनी राज्य सरकारला इशारा दिला.

मुंबई : दुषित पाणी पुरवठा, अपुरी नालेसफाई आणि पायाभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यांवरून आज ठाकरे गटाने थेट मुंबई महापालिकेवर प्रचंड मोठा मोर्चा काढला. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अनिल परब यांनी राज्य सरकारला इशारा दिला. “15 दिवसांत स्थानिकांचा प्रश्न सोडवला नाही तर अधिकाऱ्यांच्या घरचं पाणी आम्ही तोडू. तसेच विभागात जो कचरा साठेल तो कचरा अधिकाऱ्यांच्या घरासमोर नेऊन टाकू”, असा इशारा अनिल परब यांनी दिला. तसेच शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता. तरीही पालिका अधिकाऱ्यांनी बुलडोझर फिरवला. शाखेला हात लावणारा तो कोणता पालिका अधिकारी आहे, हे मला पाहायचे आहे. त्या अधिकाऱ्याचा काय बंदोबस्त करायचा ते आम्ही करून घेऊ. शिंदे सरकारमध्ये हिंमत असेल तर संबंधित पालिका अधिकाऱ्यावर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास त्या अधिकाऱ्याची कॉलर धरून त्याला उद्यापासून फिरवतो. कुठ-कुठ अनधिकृत बांधकाम आहे, हे त्या अधिकाऱ्याला दाखवतो. अधिकाऱ्याने ते अनधिकृत बांधकामही तोडावे. अन्यथा आम्ही तुम्हाला तोडू,” असंही अनिल परब म्हणाले.

 

Published on: Jun 26, 2023 04:06 PM

Follow Us
मोठी राजकीय घडामोड, तटकरे, पटेलानंतर पार्थ पवारही वर्षा बंगल्यावर… फडणवीसांसोबत काय खलबतं?.

मोठी राजकीय घडामोड, तटकरे, पटेलानंतर पार्थ पवारही वर्षा बंगल्यावर… फडणवीसांसोबत काय खलबतं?

Mahayuti Politics : अर्थ खात्यावरुन महायुतीत घमासान, अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळू नये म्हणून लावली फिल्डिंग.

Mahayuti Politics : अर्थ खात्यावरुन महायुतीत घमासान, अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळू नये म्हणून लावली फिल्डिंग

दुबई ते कतार… मध्य-पूर्वेत खतरनाक डाव, ट्रम्प यांची उडाली झोप, इराणची टार्गेट लिस्ट समोर.

दुबई ते कतार… मध्य-पूर्वेत खतरनाक डाव, ट्रम्प यांची उडाली झोप, इराणची टार्गेट लिस्ट समोर

अमेरिकेचे रात्रभर इराणमध्ये घातक हल्ले, काहीच सोडले नाही, क्षेपणास्त्रांचा...

अमेरिकेचे रात्रभर इराणमध्ये घातक हल्ले, काहीच सोडले नाही, क्षेपणास्त्रांचा..

Rohit Sharma Retirement: विराटसोबत ‘गंभीर’ चर्चा अन् रोहितच्या रिटायरमेंटची स्क्रीप्ट लिहिली, गिलने मालिकेपूर्वीच दिली होती सर्वात मोठी हिंट.

Rohit Sharma Retirement: विराटसोबत ‘गंभीर’ चर्चा अन् रोहितच्या रिटायरमेंटची स्क्रीप्ट लिहिली, गिलने मालिकेपूर्वीच दिली होती सर्वात मोठी हिंट

तो सायकलवरून आला अन् दाणकन नको तिथे हात मारला… बॉलिवूड अभिनेत्रीला आलेला हादरवणारा अनुभव.

तो सायकलवरून आला अन् दाणकन नको तिथे हात मारला… बॉलिवूड अभिनेत्रीला आलेला हादरवणारा अनुभव