AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahayuti Politics : अर्थ खात्यावरुन महायुतीत घमासान, अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळू नये म्हणून लावली फिल्डिंग

Mahayuti Politics : सुनील तटकरे यांनी केलेलं वक्तव्य सुद्धा महत्वाचं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेईन त्याचवेळी अर्थखात्याचा विषय मांडणार असं सुनील तटकरे म्हणाले.

Mahayuti Politics : अर्थ खात्यावरुन महायुतीत घमासान, अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळू नये म्हणून लावली फिल्डिंग
Sharad Pawar-Sunetra Pawar
| Updated on: Jul 17, 2026 | 10:00 AM
Share

अर्थ खात्यावरुन महायुतीत घमासान सुरु असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अर्थ खात्यावरुन चर्चा सुरु झाली. खरंतर जयंत पाटील ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात भेट घेतली होती. पण या भेटीनंतरच अर्थ खातं कोणाला जाणार, याची चर्चा सुरु झाली. अर्थ खातं पुन्हा आपल्याला मिळावं यासाठी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. जानेवारी महिन्यात अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. तेव्हापासून अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाळत आहेत. पण लवकरच हे अर्थखात मित्र पक्षाकडे दिलं जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काल जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अर्थ खातं हे या भेटीमागचं कारण असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊ नये यासाठी जोर लावला आहे. अर्थ खातं राष्ट्रवादीकडे गेल्यास निधी वाटपात भेदभाव होईल अशी शिंदेंच्या शिवसेनेला भिती आहे. म्हणून एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याचा विषय अमित शाह यांच्या कानावर घातल्याची माहिती आहे. दुसरीकडे चर्चा अशी सुद्धा आहे की, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत आल्यास अर्थ खातं हे शरद पवारांच्या पक्षाला मिळू शकतं. जयंत पाटील हे राज्याचे अर्थमंत्री होऊ शकतात.

वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत

जयंत पाटील यांच्याकडे राज्याच्या अर्थ खात्याची धुरा संभाळण्याचा अनुभव आहे. सुनील तटकरे यांनी केलेलं वक्तव्य सुद्धा महत्वाचं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेईन त्याचवेळी अर्थखात्याचा विषय मांडणार असं सुनील तटकरे म्हणाले. दरम्यान अर्थ खातं राष्ट्रवादीला देण्यास एकनाथ शिंदे यांचा विरोध आहे. नुकतीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा