Anjali Damania : धनंजय मुंडे संपला… आका, बाका, काका… राजीनामा अन् ‘त्या’ फोटोंवर दमानियाचं मोठं विधान काय?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल बोलताना दमानिया म्हणाल्या की, जनभावनामुळे त्यांचा राजीनामा घेतला गेला याच्यात काहीच दुमत नाही. त्यासाठी वरून दबाव होता की नव्हता त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. जनभावना जी होती ती ही होती आणि त्यासाठी त्यांचा राजीनामा घेतला गेला.
राजाभाऊ मुंडे नावाच्या व्यक्तीला अजित पवार गटात प्रवेश दिला याचा अर्थ धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या कुटुंबाचं राजकारण आता संपलं, असं मोठं विधान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज केलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना दमानिया म्हणाल्या की, आज सकाळपासून एक बातमी सुरू आहे ती म्हणजे संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग मिळाला नाही. आता ही बातमी आली कुठून? अजित पवार धनंजय मुंडेंना बाजूला करतात म्हणूनच धनंजय मुंडेनी थेट कार्यकर्त्यांद्वारे ही पेरली असल्याचे स्पष्ट मत दमानिया यांनी व्यक्त केलं. तर सगळ्यांपर्यंत धनंजय मुंडे संपला ही गोष्ट पोहचू नये म्हणून ही बातमी पेरण्यात आली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तर संतोष देशमुख यांचे जेव्हा फोटो बाहेर आले त्याच्यातली क्रुरता बाहेर आली आणि तो कृतांत करणारा कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा होता म्हणूनच त्यांचा राजीनामा घेतला गेला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

