Vaishnavi Hagawane Case : हगवणे कुटुंब हे विकृत… वैष्णवीचा छळ केल्याचे फोटो दमानियांकडून ट्विट अन् केली मोठी मागणी
'हगवणे कुटुंबीय फरार होण्याची ही पहिली वेळ नाही. एवढेच नाही तर दुसऱ्या सुनेने तक्रार दाखल केली तेव्हा देखील ही माणस फरार झाली होती. सुंनानाच नाही तर सुशील ला देखील छळल जायचं. ह्या कुटुंबाला खूप खूप खूप कठोर शिक्षा झाली पाहिजे.', अशी मागणी देखील दमानिया यांनी केली.
पुण्यातील वैष्णवी हगवणे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात या प्रकरणावर प्रतिक्रिया देखील समोर येत आहे. वैष्णवी हगवणे ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले राजेंद्र हगवणे यांची सून असून राजेंद्र हगवणे यांची पक्षातून नुकतीच हकालपट्टी करण्यात आली आहे. अशातच राजेंद्र हगवणे यांची मोठी सून मयुरी जगताप हगवणे यांच्याकडून हगवणे कुटुंबियांच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वैष्णवी हगवणे हिचे छळ केलेल्याचे फोटो थेट ट्वीट केले आहे. ‘वैष्णवीचे सगळ्यात ज्यास्त हाल तिच्या नणंद म्हणजे करिश्मा हगवणे करायच्या आणि त्यांच्यामुळे सासू लता आणि राजेंद्र हगवणे हे दोन्ही सूनांना छळायचे अशी माहिती मिळाली आहे’, असे दमानियांनी ट्वीट करत माहिती दिली.