तब्बल 18 वर्षांनंतर डॅडीची तुरुगांतून सुटका!
नागपूर केंद्रीय कारागृहात अठरा वर्षे शिक्षा भोगल्यानंतर अरुण गवळी यांना जामीन मिळाला आहे. कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी दोषी ठरलेले गवळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुक्त झाले आहेत आणि ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. या सुटकेने महाराष्ट्रात चर्चेला तोंड फुटले आहे.
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून अरुण गवळी यांची अठरा वर्षांनंतर सुटका झाली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणी अरुण गवळी दोषी ठरले होते आणि त्यांना जन्मठपेची शिक्षा भोगावी लागली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केल्यानंतर आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि त्यांना मुक्त करण्यात आले. सुटकेनंतर अरुण गवळी मुंबईकडे रवाना झाले आहेत. ही सुटका अनेकांसाठी चर्चेचा विषय बनली आहे.
Published on: Sep 03, 2025 02:04 PM
Latest Videos
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

