Video | राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोमात, आशिष शेलार यांची टीका

भूखंडाचे श्रीखंड पार्ट 2 हा धंदा महाविकास आघाडीने सुरू केला आहे. अशी घणाघाती टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.

मुंबई : सध्याची अवस्था राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोरात अशी आहे. पोलिसांकडून राज्यात वसुलीचे काम सुरू आहे.
महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की स्वबळ असे करतात. कोणी दिल्लीला जात आहे, तर कोणी बैठक घेत आहेत.
महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की 108 वेळा मंत्र जपत आहेत. भूखंडाचे श्रीखंड पार्ट 2 हा धंदा महाविकास आघाडीने सुरू केला आहे. अशी घणाघाती टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.