Assembly Session : औरंगजेबाची कबर काढण्याचा मुद्दा पेटला; विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
Assembly Budget Session 2025 : राज्यात एकीकडे औरंगजेबाची कबर काढण्याच्या मुद्द्यावरून नागपूरमध्ये काल दोन गटात राडा झाला असताना आज याच मुद्द्यावरून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आमनेसामने आलेले बघायला मिळाले.
राज्यात औरंगजेबाची कबर काढण्याचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. एकीकडे ठिकठिकाणी आंदोलन होत असतानाच आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याचे पडसाद बघायला मिळाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचा आज दूसरा दिवस आहे. नागपूरमध्ये याच मुद्द्यावरून सोमवारी रात्री दोन गटात राडा झाला. त्यानंतर आज सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत कबर काढून टाकण्याची मागणी केली. त्यानंतर विरोधीपक्षाने देखील सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे औरंगजेबाची कबर काढण्याचा मुद्दा अजून चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे विधान भवनाचा परिसर दणाणून गेला होता.
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन..
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट

