Bachchu Kadu News : जिथं दिसतील तिथं ठोकलं पाहिजे; बच्चू कडूंची भाजप नेत्यांवर सडकून टीका
Bachchu Kadu Slams CM Fadnavis : प्रहार पक्ष प्रमुख बच्चू कडू यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शक्तिपीठ मार्ग आणि शेतकरी कर्जमाफीवरून टीका केली आहे.
शेतकऱ्यांनी यांना रस्त्यावर फिरुच नाही दिलं पाहिजे. जिथं भेटेल तिथं ठोकलं पाहिजे, अशी टीका प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केली आहे. भाजप नेते बबनराव लोणीकर तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या विधानावर त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ८५ हजार कोटीचा महामार्ग आम्ही मागितला नाही. तो आमच्यावर थोपवू नये. कर्जमाफीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत काही अडाण्यांचे खिसे भरण्यावर भर देण्याची आवश्यकता नाही. आधी भूमीरूपी खऱ्या शक्तिपीठाचे रक्षण महत्वाचे आहे आणि म्हणूनच शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या सर्व संघटनांना आमचा पाठिंबा आहे. धनधान्य देणारी काळी आई ही खरे शक्तिपीठ आहे. तिच्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्याला न्यायाचा महामार्ग खुला करून देणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे, असंही त्यांनी यावेळी म्हंटलं.

Padalkar : तुम्हाला जमत नसेल तर मी बोलत नाही, पडळकर भरसभागृहात भडकले

एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, 'विधान भवनाचं पावित्र्य ...'

भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?

आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या अन्..
