Badlapur : मराठीचा अपमान पडला महागात अन् धु-धु धुतलं… बदलापुरात नेमकं काय घडलं? VIDEO तुफान व्हायरल
बदलापूर येथे अतिक्रमण कारवाईदरम्यान एका भाजी विक्रेत्याने मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरले. यानंतर त्याला मारहाण करण्यात आली असून, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी हातगाडी हटवण्यास सांगितल्यावर ही घटना घडली
बदलापूर शहरात एका भाजी विक्रेत्याला मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पालिका अतिक्रमण विभागाच्या कारवाईदरम्यान घडली. पालिका कर्मचारी एका भाजी विक्रेत्याला त्याची हातगाडी हटवण्यास सांगत होते. याचवेळी, संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्याने मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरले. त्यानंतर त्याला जमावाकडून मारहाण करण्यात आली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती भाजी विक्रेत्याला “मराठीला का बोलला?” असे विचारताना आणि त्याला बोलण्यास सांगताना दिसत आहेत. या प्रकरणाची माहिती पोलिसांना अद्याप दिली नसल्याचे समोर आले आहे. पोलीस या घटनेची दखल घेतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

