'वांद्रे सुरक्षित नाही....तोपर्यंत काही घडू शकते...,' काय म्हणाले झिशान सिद्दीकी ?

‘वांद्रे सुरक्षित नाही….तोपर्यंत काही घडू शकते…,’ काय म्हणाले झिशान सिद्दीकी ?

| Updated on: Jan 18, 2025 | 1:36 PM

वांद्रे परिसरात गेल्यावर्षी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळीबारात हत्या झाली होती. या प्रकरणात प्रमुख आरोपीची कस्ठडी जोपर्यंत मिळत नाही. या कोणतीही घटना नाकारता येत नाही अशी भीती बाबा सिद्दीकी यांचे पूत्र झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली आहे.

वांद्रे येथे अभिनेता बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात शिरुन चोरट्यानी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. सैफ अली खान याच्या सहा वार झाल्याने त्याच्यावर मोठी शस्रक्रीया केली असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. या हल्ल्यानंतर अजूनही आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणात आता दिवंगत बाबा सिद्दीकी यांचा पूत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे परिसरात माझा जन्म झालेला आहे. पूर्वी हा परिसर जितका सुरक्षित होता आता तो राहिलेला नाही. माझ्या वडीलांबरोबर आणि मलाही मारण्याचा बिश्नोई टोळीचा प्लान होता. जोपर्यंत बिश्नोईला अटक केली जात नाही. तोपर्यंत कोणतही घटना घडू शकते असेही झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे. मी पोलिसांना काही संशयित बिल्डरची नावे दिली होती. पोलीसांनी त्यांची काही चौकशी केलेली आहे. ही नावे कोर्टात चार्जशिट दरम्यान बाहेर पडतील. या प्रकरणात पोलिसांना योग्य तपास केलेला नाही असा आरोपही राष्ट्रवादीचे आमदार  झिशान सिद्दकी यांनी केला आहे.

 

Published on: Jan 18, 2025 01:24 PM