Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Band Video : देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो-व्हिडिओ समोर आल्यानंतर बीड जिल्हा सुन्न, 100% बंद अन् एकच शुकशुकाट

Beed Band Video : देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो-व्हिडिओ समोर आल्यानंतर बीड जिल्हा सुन्न, 100% बंद अन् एकच शुकशुकाट

| Updated on: Mar 04, 2025 | 5:53 PM

संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे फोटो समोर आले त्यांनंतर संपूर्ण बीड जिल्हा सुन्न झाला. त्यानंतर कालच रात्री बीड बंदची हाक देण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा पीएच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर या बंगल्यावर सुपूर्द केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात माहिती दिली. तर दुसरीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो आणि व्हिडिओ काल सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आज बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या समर्थकांकडून बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदाला शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला आहे. व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत आजच्या बंदामध्ये सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळपासूनच बीडमध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. शंभर टक्के बंद या ठिकाणी ठेवण्यात आल्याने बीडमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे फोटो समोर आले त्यांनंतर संपूर्ण बीड जिल्हा सुन्न झाला. त्यानंतर कालच रात्री बीड बंदची हाक देण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

संतोष देशमुखांची हत्या कशाप्रकारे झाली याचा सारा वृत्तांत पोलिसांनी सादर केलेल्या चारशीटमधून समोर आलाय. त्यात हत्येच्या वेळच्या मारेकऱ्यांच्या मोबाईल मधून जप्त झालेले व्हिडिओ आणि फोटोही आहेत एकूण 15 व्हिडिओ आणि 8 फोटोचा उल्लेख पोलिस तपासात करण्यात आलाय. ते फोटो व्हिडिओ इतके विदारक होते की मन असणारा माणूस काही क्षण सुन्नच पडेल.

देशमुखांना जबर मारहाणीनंतर चेहऱ्यावर लघवी अन् जनावराच्या चामडीसारखी पाठ सोलली; मृत्युलाही शहारे अशी क्रूर हत्या, फोटो-व्हिडीओ बघून होईल मन सुन्न

Published on: Mar 04, 2025 05:53 PM